
वर्षाच्या सुरुवातीला सगळीकडे लगबग संक्रांतीची.
गुलाबी थंडीतही ऊब नात्यांची.
तीळ आणि गुळाची स्पेशल जोडी.
सणाला येते मग अवीट गोडी.
खमंग तीळ आणि गोडवा गुळाचा.
सुगंध दरवळे चिमुटभर वेलचीचा.
लाडू ,वड्या किंवा असो हल्वा मस्त.
चुटकीसरशी होतो फस्त.
नातलगांना ,शेजाऱ्यांना, लहापणापासून मोठ्यांना.
तिळगुळ प्रिय अतिशय सर्वांना.
आजच्या दिवशी मिटते भांडण, संपतो अबोला.
खरंच..
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.