सुख ,शांती ..लाभो विचारांची प्रगल्भता
नव्या आशा ,नवीन आकांक्षा.
नव्या वर्षाकडून करूया,
याच माफक अपेक्षा.
वर्ष नवे आनंद नवा.
असमंतातला उत्साह वाटे हवा हवा.
नव्या वळणांचे स्वागत करून.
वेगळ्या वाटा बघुयात अवलंबून.
आपल्या कर्तृत्वाने ,वेगळी उंची गाठून.
२०२० चे करूया स्वागत मनापासून.
२०१९ च्या या संध्याकाळी.
सहज मनात मग विचार येई.
कास धरूयात नव्या विचारांची .
आशावादी असेलच सकाळ उद्याची.
