चहा…
कुणाला गोड,एकदम कडक.
तर कोणाला हलका आवडतो.
कोणाला मसाला,तर कोणाला,
“आल्याचाच “लागतो.
दिवसाच्या सुरुवातीला एक तरी कप.
हवाच असतो.
प्रत्येकाचा चहा,हा खासच असतो.

वाफाळत्या गवती चहानी,दिवसाची सुरुवात छान होते.
हिवाळ्याची सकाळ मग,आणखीनच ऊबदार होते.
तिखट भजी सवे, गरम चहा ची गोडी.
पावसाळ्या संध्याकाळी , धमाल जोडी.
प्रत्येकाच्या आठवणीत
एक ‘कटिंग चाय’
तर नेहेमीच असतो.
कट्ट्या वरती गप्पांना, मग उधाण येते.
कुणी असे आणि कुणी तसे प्लॅन्स सुचवते.
कार्य समारंभी ,पाहुणे येती.
अर्धा कप ..मला ..मलाही चालेल म्हणती.
किचन चाहानेच ,बिझी राहते.
मग घर भरल्याचे फिलिंग येते.
दिवसभराची पायपीट.
क्षणांत एका थकवा जातो.
एक तरी कप चहा,हवाच असतो.
सकाळची गडबड सरता,निवांत असा आईचा.
एक चहा रात्री,अभ्यासाच्या जाग्रणाचा.
एक दोन कप,ऑफिस मध्यल्या टेन्शनचा असतो.
प्रत्येकाचा चहा ,हा खासच असतो.
या,तुमच्या आमच्या सारख्या
चाय के शौकीन लोकांची
गंमतच न्यारी.
सर्वांना वाटते ,आपल्या कपातला चहा,
म्हणजे जगात भारी..!!
Priya Washikar